सी. पी. अँड बेरार महाविद्यालयाला कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक

नागपूर : चंद्रपूर जिल्हा क्रिडा अधिकारीद्वारा आयोजित १९ वर्षांखालील विभागीय आंतर शालेय कुस्ती स्पर्धेत सी. पी. अँड बेरार कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिमांशू लांजेवार या विद्याथ्र्यांने सुवर्ण पदक पटकविले. हिमांशू लांजेवार याने सुवर्ण पदक पटकवून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंतर शालेय कुस्ती स्पर्धेत आपले स्थान निश्चित केलेले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मिलिंद बाराहाते, उपप्राचार्य डाॅ. जे.के. महाजन, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख डाॅ. आरती बाराहाते, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डाॅ. तिपटे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृद, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी हिमांशूचे अभिनंदन केले.