मुंबईत एमआयएमच्या गडाला शिवसेनेचा सुरुंग; यामिनी जाधव आघाडीवर

Geeta Gavali

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अनेक मतदारसंघांमधील प्राथमिक कल हाती आले आहेत. निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकाल

मुंबईतल्या भायखळा मतदारसंघात एमआयएमच्या गडाला सुरुंग लावण्यात शिवसेना यशस्वी ठरताना दिसत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे २०१४ साली एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेले वारिस पठाण आपला मतदारसंघ गमावण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसचे मधु चव्हाण आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनीही भायखळा मतदारसंघात आव्हान उभं केलं होतं. मात्र मतमोजणीत या सर्व उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारल्याचं समोर येत आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९