वारंवार ‘साॅरी’ म्हटल्याने नात्यात येऊ शकते दरार..

Relation

आपण ज्यांच्यावर प्रेम करतो किंवा ज्यांना आपल्याला दुखवायचे नसते. त्यांना आपण पटकन सॉरी बोलून टाकतो. कधी कधी तर आपली चूक नसताना ही आपण सॉरी बोलतो. पण असे करणे बरोबर नसून त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमजोर होतो. याशिवाय सतत सॉरी बोलण्याचे मानसशास्त्रज्ञाच्या दृष्टीने अनेक तोटे आहेत. जाणून घेऊयात याबाबत…

  • आपल्या आसपासच्या व्यक्तिंना खुश ठेवण्यासाठी तसेच त्यांच्याकडून स्तुती करून घेण्यासाठी अशा व्यक्ति सतत दुसऱ्यांच्याच विचारात असतात. त्यामुळे बऱ्याचदा या व्यक्ति ‘मीच सर्वांबाबत विचार करते माझा विचार कोणीच करत नाही’ या विचाराने ग्रस्त होतात. याचाही दोष स्वतःलाच देऊन दुःखी होतात.

sorry

  • ज्या व्यक्ति अतिसंवेदनशील असतात त्या लहान लहान गोष्टींचा फार विचार करतात. कोणत्याही जुन्या गोष्टी आठवून समोरच्याला सतत त्यासाठी सॉरी म्हणतात. त्यामुळे समोरची व्यक्ती चांगल्या मूडमध्ये असेल तरिही त्याचा मूड खराब होऊन वादांना सुरुवात होते. या कारणाने नात्यांमध्ये बऱ्याचदा दुरावा येतो.

  • सारखे स्वतःला दोषी समजण्याची सवय व्यक्तिचे मानसिकदृष्ट्या खच्चिकरण करते. यामुळे स्वतःबाबत कमीपणाची भावना तयार होते. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, ज्या व्यक्तिंचे बालपण फार शिस्तीत गेले असून ज्यांचे पालक अति काळजी घेत असतील, मोठे झाल्यावर या व्यक्तिंचा आत्मविश्वास फार कमी होतो. कोणत्याही विषयावर निर्णय घेताना या व्यक्ति दुसऱ्यांवर अवलंबून राहतात.