उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, गुजरातमधील पोटनिवडणुकांचा तारखा जाहीर

Election Commison Of India

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, गुजरात या राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून मतमोजणी १० नोव्हेंबरला होणार आहे.

या पोटनिवडणूका लोकसभेच्या एक आणि विधानसभेच्या ५६ जागांसाठी होणार आहेत. मतदान ३ आणि ७ नोव्हेंबरला होईल. यात विधानसभेच्या ५४ जागांसाठी ३ आणि लोकसभेच्या एका जागेसाठी व मणिपूरच्या विधानसभेच्या २ जागांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

छत्तीसगढ़, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, नागालैंड, ओडिशा, तेलंगणा आणि उत्तरप्रदेशात ३ नोव्हेंबरला आणि बिहारमधील वाल्मीकिनगर लोकसभेसाठी व मणिपूरच्या विधानसभेसाठी ७ नोव्हेंबरला मतदान होईल.

असम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील पोटनिवडणुकींच्या तारखा घोषित कर्म्याट आलेल्या नाहीत. या राज्यांच्या मुख्य सचिवांनी आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पोटनिवडणूक घेण्याबाबत काही अडचण दर्शवल्याने येथील निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, असे कळते. येथे विधानसभेच्या ७ जागांवर निवडणुका व्हायच्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER