… पण झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार? चंद्रकांत पाटलांचे ट्वीट

Chandrakant Patil & Uddhav Thackeray

पुणे : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारला घेरणाऱ्या भाजपनं (BJP) अधिवेशनानंतरही सरकारवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज सकाळीच एक ट्वीट केले आहे. महाराष्ट्रातील गुन्ह्यांची तारखेसह आकडेवारी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिली आहे. ‘हे असे कधीपर्यंत चालणार?’ असा सवालही त्यांनी केला आहे.

‘आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या, तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पुण्यातील युवतीच्या मृत्यूसारख्या घटना स्मरणात आल्या,’ असं पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘ठाकरे सरकार याकडं कधी गांभीर्यानं लक्ष देणार? या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार? झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार?,’ असे सवालही पाटील यांनी केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER