… पण, सीडी लावण्याचं काम अजून बाकी ; महाजनांच्या मतदारसंघातून खडसेंचा इशारा

Girish Mahajan - Eknath Khadse

जळगाव : सध्या राज्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची (NCP) कौटुंबिक संवाद यात्रा सुरू आहे. काल जयंत पाटील खडसेंचा बालेकिल्ला मानला जाणा-या जळगाव दौ-यावर होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांना हा जिल्हा राष्ट्रवादीमय होईल असा विश्वास दिला. तसेच, भाजपच्या नेत्यांना खुले आव्हानही केले.

जामनेर हा भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा मतदारसंघ आहे. येथे बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा ईडी आणि सीडी वक्तव्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, सीडी लावण्याबाबत मी गंमतीने बोललो होतो. पण खरंच माझ्या मागे ईडी लावलीत, आता सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश घेताना माझ्या मागे ईडी (ED) लावली तर मी सीडी लावेल, असं मी गंमतीने म्हणालो होतो. जयंतराव मला म्हणाले, तुमच्या मागे ईडी लागली तर तेव्हा मी म्हणालो मग मी सीडी लावेल. पण खरंच माझ्या मागे ईडी लागली. त्यामुळे आपलं काम अजून बाकी आहे. त्यांनी ईडी लावली. आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे, असा इशारा खडसेंनी दिला. खडसे यांच्या या इशाऱ्यामुळे भाजपमध्ये पुन्हा खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

काल गुरुवारी रात्री 12 वाजता जामनेर येथे राष्ट्रवादी संवाद यात्रेला एकनाथ खडसे संबोधित करत होते. यावेळी नाथाभाऊ आपल्या सोबत असल्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. नाथाभाऊंच्या कामामुळे खान्देशातील जनतेचा पक्षाला नक्कीच पाठिंबा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER