…पण बंगालच्या जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले; एकनाथ खडसेंचे टीकास्त्र

Eknath Khadse - PM Narendra Modi - Maharashtra Today
Eknath Khadse - PM Narendra Modi - Maharashtra Today

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, २०० पेक्षा अधिक जागांवर तृणमूल काँग्रेसने (Congress) आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या निकालावर भाष्य केले. पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एक वेळ तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून जनतेने दूर ठेवले आहे, असे म्हणत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोदी (PM Narendra Modi) सरकारवर निशाणा साधला.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला दोन तृतीयांश मतदानाकडे सध्या वाटचाल सुरू आहे. अशा स्वरूपाचे आज दिसत आहे. पश्चिम बंगालची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भारतीय जनता पार्टीचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी प्रचारासाठी होते. या ना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली होती, असा टोला खडसे यांनी भाजपला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button