…आणि सोनू सूद आमच्या आयुष्यात एक हिरो बनून आलेत

वाराणसीतही पोहचली सोनू सूदची मदत

Sonu Sood - Varanasi

मुंबई : यंदा अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला; मात्र काही ठिकाणी याच पावसाने जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे. वाराणसीत गंगा नदीला पूर आल्याने तेथील प्रशासनाने नौकाविहार करण्यास १५ सप्टेंबरपर्यंत बंदी घातली आहे. यामुळे ३५० नावाडी कुटुंबांना उपाशी राहण्याची वेळ आली होती. मात्र, लॉकडाऊन (Lockdown) काळात मजुरांना त्यांच्या घरी पाठवणाऱ्या सोनू सूदने (Sonu Sood) मदतीसाठी मैदानात उतरून नागरिकांना सेवा देण्यास तत्परता कायम ठेवली आहे.

येथील नौकाविहार बंद झाल्यानंतर सोनू सूदनेही या ३५० कुटुंबांना उपाशी झोपू देणार नाही असे म्हटले होते. त्याप्रमाणे सोनू सूदने आजच काही तासांतच रेशनचे किट १०० नावाडी कुटुंबांच्या घरी पोहचवले आहेत.

२० किलोच्या रेशन किटमध्ये प्रत्येकी पाच किलो पीठ, तांदूळ, प्रत्येकी एक किलो चणा डाळ, मीठ आणि तेल आहे. तर, मसाल्यांसह अन्य काही वस्तूही या किटमध्ये आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत अन्य सर्व कुटुंबांना हे रेशनचे किट मिळतील, असं दिव्यांशु उपाध्याय यांनी सांगितलं आहे.

तर कोरोना (Corona) काळातच पुराचाही फटका बसलेल्या कुटुंबीयांनी सोनू सूदचे आभार मानत सोनू सूद आमच्या आयुष्यात एक हिरो बनून आले असल्याची भावना व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER