‘पण काही बाटग्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्ली दरबारी विदेशी राज्यकर्त्यांसमोर मुजरा केला’

Atul Bhatkhalkar - Maharashtra Today

मुंबई : ‘महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे, बूड आहे म्हणून तो टिकला आहे. आज महाराष्ट्रावरचं संकट मोठं आहे. कोरोना विषाणूनं मोठं आव्हान उभं केलं आहे. शंभर वादळे, शंभर भूकंपांनी पडझड होणार नाही त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील आणि विजयी होईल!’ असं म्हणत महाराष्ट्रदिनानिमित्त शिवसेनेने (Shivsena) आजच्या सामनातून भाजपला (BJP) डिवचले आहे. त्यानंतर भाजपने शिवसेनेवर पलटवार केला आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जनाबसेना म्हणतेय, महाराष्ट्राने कधीच दिल्लीची गुलामगिरी स्वीकारली नाही. शंभर टक्के सत्य…पण काही बाटगे मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी कायम दिल्ली दरबारी विदेशी राज्यकर्त्यांसमोर कमरेत वाकून मुजरा करीत राहिले, असा पलटवार भातखळकर यांनी शिवसेनेवर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button