…पण राज्य सरकारकडून शिक्षक दिनी ना त्यांचे कौतुक, शुभेच्छा ना आदर्श पुरस्कार!

Aashish Shelar-CM Uddhav Thackeray

मुंबई :  आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभर शिक्षक दिन (Teachers Day) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी शिक्षकांचे विशेष कौतुक करणारे कार्यक्रम शासनाकडून आयोजित केले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे (Corona) अनेक कार्यक्रमावर बंदी आली त्यात शिक्षकांकडेही दुर्लक्ष्यच झाले असल्याची खंत भाजपा नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी व्यक्त केली आहे.

शिक्षकांनी कोरोना काळात कोविड योद्धे म्हणून काम केले मात्र, त्यांच्या कार्याचा कुठेही गौरव होताना दिसला नाही. त्याउलट कोरोनाच्या रिसेशनमध्ये शिक्षण सेवकांची पदेही रद्द केली. अशी टीका शेलार यांनी केली आहे.

एवढेच नाही तर, शिवसेनेवर निशाणा साधताना कशाप्रकारे शिक्षणमंत्र्यांनी पक्षाच्या वतीने जाहीरात देऊन शिक्षकांना कोरड्या शुभेच्छा दिल्या अशा आशयाचे ट्विट करून शेलार यांनी ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

समाज घडवण्याऱ्या शिक्षकांनी कोरोना योध्देम्हणून मोलाचे कार्य केले. पण राज्य सरकारकडून शिक्षक दिनी ना त्यांचे कौतुक, शुभेच्छा ना यावेळी आदर्श पुरस्कार! (बहुधा सरकारने दाद न दिल्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांना पक्षातर्फे जाहिरात देऊन शिक्षकांना शुभेच्छा द्याव्या लागल्या!!) असे ट्विट शेलार यांनी केले आहे.

तसेच, दुस-या ट्विटमध्ये आशिश शेलार यांनी शिक्षकांच्या व्यथा मांडल्या आहेत. आर्थिकस्थिती बिकट असल्याने कशी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आणि शिक्षकांनी आत्महत्येन प्राण गमावले. धुळ्याती शिक्षकांचे उदाहरण देऊन शेलार यांनी ठाकरे सरकारचे कान टोचण्याचा प्रयकत्न केला आहे.

धुळ्यात एकाच दिवशी दोन शिक्षकांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली? महाराष्ट्रातील शेतकरी आणि शिक्षकांच्या या घटना चिंताजनक आहेत. शिक्षक दिनी राज्य सरकारने “कोविड योद्धया शिक्षकांना” पुरस्कार, सन्मान, वेतन, सेवा सुविधांबद्दल आश्वस्त केले नाही.! खंत!! असे आशिश शेलार ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER