पण, देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भांडणाचा फायदा दुस-यांना होऊ देणार नाही, मी भाजपसोबतच…

Mahadev Jankar - Devendra Fadnavis

बारामती :- माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच (BJP) राहणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. पण गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असं जानकरांनी स्पष्ट केलं आहे. भाजपवर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या NDAमध्येच आहोत आणि पुढेही NDAमध्येच राहणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं, असंही जानकर म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री ठाकरेंनी फडणवीसांचा आणखी एक निर्णय केला रद्द

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरुच असल्याचं जानकरांनी सांगितलं. माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण सुरु आहे. पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण NDAमध्येच राहणार असल्याचं जानकर म्हणाले.

महादेव जानकर यांनी 3 तारखेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबतं झाल्याचं सांगण्यात येतं. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचं जाहीर केलं आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे. तसेच पवारांची भेट घेण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना या भेटीची कल्पना दिली होती, असा दावाही जानकर यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER