शेअर बाजार गडगडला; ५५० अंकांची घसरण

bussiness news stock market.jpg

मुंबई : गुरूवारी सकाळी मुंबई शेअर बाजारात (stock market) मोठी घसरण झाली. सुरूवातीच्या सत्रात निर्देशांकात ३८६.२४ अंकांची घसरण होऊन बाजार ३७,२८२.१८ वर उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही १२० अंकांची घसरण होऊन तो ११,०११ वर उघडला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काहीच वेळात निर्देशांकात ५५० अंकांपर्यंतची घसरण झाली.

शेअर बाजारातील सर्व प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली आहे. इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा. बजाज फिनसर्व, मारुती, अॅक्सिस बँकेच्या समभागांमध्ये १.५० टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजारातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक, बांधकाम व्यवसाय, मीडिया आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये २ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली.

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली होती. औषध कंपन्या आणि बँकांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. अखेरच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६६ अकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात २२ अकांची घसरण होऊन बाजार अनुक्रमे ३७,६६८,४२ आणि ११,१३२ वर बंद झाला होता.

जागतिक बाजाराचा शेअर बाजारावर परिणाम झाल्याने घसरण झाल्याचे म्हटले जात आहे. बुधवारी अमेरिकेतील शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. बुधवारी डाओ ५०० अंकांनी तर नॅस्डॅक ३०० अकांनी घसरला होता. अॅपल, अॅमेझॉन, एनविडीयासारख्या दिग्गज कंपन्यांचे समभागही चार टक्क्यांपर्यंत कोसळले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER