उद्योगपती राम मेनन यांचे निधन

Ram Menon

कोल्हापूर : कोल्हापूरच्या उद्योगविश्वातील पितामह ज्येष्ठ उद्योगपती राम मेनन यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. मेनन यांनी उभारलेल्या मेनन अँड मेनन, मेनन पिस्टन, मेनन बेअरिंग्ज या उद्योगांच्या उत्पादनांनी जगभरात नाव कमावले. अमेरिकेतील अँल्कॉप या उद्योग समूहासमवेत त्यांनी मेनन अँल्कॉप ही कंपनी सुरू केली आहे.

ही बातमी पण वाचा : पावनखिंडीत मद्यपींना शिवप्रेंमीकडून चोप

राम मेनन मूळचे केरळचे असून कोल्हापुरात त्यांनी इंजिनीअर म्हणून नोकरीस सुरुवात केली. दरम्यान, ते उद्योजक बापूसाहेब जाधव, दादासाहेब चौगुले, हेमराज यांच्या संपर्कात आले. त्यांनी स्वतःच उद्योग सुरू करण्याचे ठरवले. मेनन पिस्टन हा उद्योग त्यांनी बंधू चंद्रन मेनन यांच्यासमवेत सुरू केला. हुशारी, चिकाटीच्या जोरावर त्यांनी वाहनांना लागणारे दर्जेदार पिस्टन बनवले.

पिस्टनचा जागतिक दर्जा पाहून, मारुती सुझुकी मोटार भारतात बनवण्याचे ठरवले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनी राम मेनन यांना मोटारीचे पिस्टन बनवण्यासाठी खास निमंत्रित केले होते. मेनन यांच्या जाण्याने कोल्हापूरच्या उद्योगविश्वाचा आधारवड गेल्याची भावना मान्यवरांकडून व्यक्त होत आहे.

ही बातमी पण वाचा : शास्त्री पुलावरून कोसळलेल्या कंटेनरचा चालक अजून बेपत्ता