वड्डेवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन : पोलीस आणि कार्यकर्त्यांत झटापट

Burning of symbolic statue of Vijay Wadettiwar Clashes between police and activists

कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेवार (Vijay Wadettiwar) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिस आणि महिला कार्यकर्त्यांत झटापट (Clashes between police and activists)झाली. दसरा चौकात काही काळ तणाव निर्णाण झाला होता.

दरम्यान, यापुढे आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मागासवर्ग आयोग बोगस म्हणणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईची मागणी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. सरकार आरक्षण प्रश्नी गंभीर नाही. जे हातात आहे ते ही देत नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

मराठा आरक्षण क्रांती मोर्चाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी दसरा चौकात सलग पाचव्या दिवशी हे आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पुतळा काढून घेतला. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा क्रांती आंदोलनाला पाठिंबा दिला. लोकशाही मार्गाने सुरू असणाऱ्या प्रत्येक आंदोलनात सोबत राहू असे आश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER