कोल्हापुरात कंगना राणावतच्या पुतळ्याचे दहन

Kolhapur

कोल्हापूर : अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेकडून कागल येथे कंगनाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

यावेळी शिवसेना पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या व संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखावणारे स्टेटमेंट देणाऱ्या कंगनाचा आम्ही कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने जाहीर निषेध करत आहोत. तसेच यापुढे त्यांनी अशा पध्दतीचे वक्तव्य केल्यास संपूर्ण राज्यात तिचे चित्रपट बंद पाडू शिवाय जशास तसे उत्तर देवू, असा इशारा आंदोलकांनी दिला.

यावेळी कंगना चले जाव, कंगना राणावत मुर्दाबाद अशा निषेधाच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. यावेळी डॉ. प्रदीप पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख संदीप पाटील, नागेश असते, अमित पाटील, रामदास पाटील, आकाश पाटील, डॉ. के एम पाटील, सुदाम पाटील, शामराव निऊंगरे, विशाल पाटील, सुशांत पाटील, गुरूनाथ डोंगळे, वैभव पाटील, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER