पीक जाळून टाकू पण आंदोलन मागे घेणार नाही : राकेश टिकैत

दिल्ली :- केंद्र सरकारने (Central Govt) लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घ्या या मागणीसाठी सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन थंड पडते आहे, असे सांगितले जात असतानाच ‘भारतीय किसान युनियन’चे प्रवक्ते आणि आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) म्हणालेत की, गरज पडल्यास शेतकरी त्याचे पीक जाळतील पण आंदोलन (Farmers Protest) सुरु ठेवतील.

हरणायामधील खरक पुनिया येथे शेतकऱ्यांच्या सभेत बोलताना टिकैत म्हणालेत, शेतकरी मागे घटणार नाहीत. पीक पेरणी आणि शेतीच्या इतर कामांसाठी शेतकरी परत जातील असा गैरसमज केंद्र सरकारने ठेऊ नये. बळजबरी केली तर आम्ही आमचे पीक जाळू पण आंदोलनातून मागे हटणार नाही. हे आंदोलन दोन महिन्यामध्ये थंड होईल असा समज सरकारने करुन घेऊ नये.

केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे. संघटनेचे नेते केंद्राला प्रस्ताव का देत नाहीत? या प्रश्नाच्या उत्तरात टिकैत म्हणालेत, आम्हीदेखील केंद्राशी चर्चा करायला तयार आहोत. आम्ही प्रस्ताव यापूर्वीच दिले आहेत. आता प्रस्ताव केंद्र सरकारकडून आला पाहिजे. त्याशिवाय, पुढील संवाद होऊ शकत नाही. केंद्राने शेतकरी संघटनांना आमंत्रण देऊन चर्चा पुन्हा सुरू करावी. केंद्राने तोडगा आज काढावा, नाही तर १० दिवसांनी वा दोन वर्षांनी.. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.

ही बातमी पण वाचा : शेतकरी आंदोलन चिघळणार? दिल्लीत पुन्हा 40 लाख ट्रॅक्टर आणण्याचा टिकैत यांचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER