बुमरा पहिल्यांदा सुपर ओव्हरमध्ये हरला

Jasprit Bumrah

आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ दोनशेपेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करु शकत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले. राॕयल चॕलेंजर्सविरुध्द (Royal Challengers Bangalore). सोमवारी त्यांनी सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचला पण विजय काही हाती आला नाही. आणि त्यांचा जो हुकूमी गोलंदाज आहे जसप्रीत बुमरा (Jaspreet Bumrah) , त्याला सुपर ओव्हरमध्ये सात धावांचे रक्षण करण्यात अपयश आले.सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर राॕयल चॕलेंजर्सला हवी असलेली विजयी धाव विराट कोहलीने घेतली.

बुमराच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तो आपला संघ, मुंबई इंडियन्स असेल किंवा टीम इंडिया असेल, त्यांना सुपर ओव्हरमध्ये टी-20 सामना जिंकून देऊ शकलेला नाही. यापूर्वी चार सामन्यात त्याने सुपर ओव्हर टाकले आहे आणि चारही वेळा त्याचा संघ जिंकला आहे मात्र आता राॕयल चॕलेंजर्सने ती मालिका खंडीत केली आहे.

बुमराचे सुपर ओव्हर

निकाल— धावा— विरुध्द———— ठिकाण— वर्ष
विजय—- 6/0—- गुजराथ लायन्स- राजकोट- 2017
विजय—- 8/2—- सनरायजर्स —— मुंबई —- 2019
विजय—- 17/0– न्यूझीलंड———- हॕमिल्टन- 2020
विजय—- 13/1– न्यूझीलंड——— वेलिंग्टन- 2020
पराभव– 8/0 — राॕयल चॕलेंजर्स— दुबई —– 2020

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER