बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं : अमोल कोल्हेंची आदित्य ठाकरेंवर टीका

amol-kolhe-aditya-thackrey

सोलापूर : शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरूवात आजपासून झाली आहे. यावेळी जुन्नर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत शिरूरचे खासदार अमोर कोल्हे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले .

काही लोक संवाद यात्रेच्या निमित्ताने शेतात जात आहेत. मात्र त्यांची अवस्था, ‘बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं’ अशी झाली असल्याचे सांगत कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला . लातूरमध्ये आदित्य ठाकरे यांनी शेतीप्रश्न समजून घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. शेतकऱ्यांसोबत त्यांनी शेतात काम करण्याचा अनुभवदेखील घेतला होता. ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांसोबत पेरणी करत सध्याच्या पेरणीची स्थिती आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. मात्र हे सर्व प्रसिद्धीसाठीच होते, असे कोल्हे म्हणाले . तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला .

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला .यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवनेरीवर उपस्थित होते.