… अन सराफा व्यापाऱ्याने दागिने घेऊन ठोकली धूम

fraud

नागपूर : अचानक गृहस्थीत आलेल्या आर्थिक अडचीण सोडविण्यासाठी तसेच कुणाचे उधार देण्यासाठी सराफकडे आपली मौल्यवान वस्तू गहाण ठेवतात आणि गरज भागवितात मात्र सराफ व्यापारीच चोर झाल्यास ग्राहकाने कुणाकडे जावे. नागपुरात ग्राहकांनी गहाण म्हणून ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने घेऊन नंदनवनमधील सराफा व्यापाऱ्याने धूम ठोकली. हा प्रकार उघड झाल्याने अयोध्यानगरात खळबळ उडाली असून, फसगत झालेल्यापैकी एकाने नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

हसनबागेतील रहिवासी सय्यद अशरद अब्दुल गफ्फार (वय ३०) यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी अयोध्यानगर, नंदनवनमधील येरपुडे ज्वेलर्स या सराफा दुकानात १० ऑगस्टला दुपारी २ वाजता सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी हे दागिने गहाण ठेवले होते. आर्थिक गरज दूर झाल्यानंतर सराफा येरपुडे यांची रक्कम परत करण्यासाठी अशरद काही दिवसांपूर्वी येरपुडे ज्वेलर्समध्ये गेले असता त्यांना दुकान बंद दिसले. अशरद यांनी काही दिवस वाट बघितली. मात्र, आजूबाजूच्यांना विचारल्यानंतर येरपुडे पळून गेल्याचे त्यांना कळाल्याने त्यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी येरपुडे ज्वेलर्सच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपिला अटक करू असे पोलिसांनी सांगितले.