अकोल्यात इमारत कोसळली ; ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू

Building Collapse

अकोला : अकोल्याच्या सुभाष चौक परिसराजवळ काल रात्री एक जीर्ण इमारत कोसळल्याची मोठी घटना समोर आली आली आहे. या घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला असुन अन्य चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

कल्पना चोपडे यांचा घटनेत मृत्यू झाला असून कुटुंबातील अन्य चार जण जखमी झाले आहेत.
तेलीपुरा चौकामध्ये जानकी रामजी चोपडे यांचे कुटुंबीय याच दुमजली इमारतीत राहतात. तिथेच त्यांचा क्लासही आहे.

ही बातमी पण वाचा : ‘लोकराज्या’ सेनेला दुय्यम स्थान देण्यावरून शिवसेनेचे नेते आक्रमक!

रात्री नऊ वाजता जेवण आटोपल्यानंतर चोपडे कुटुंबीय घरात गप्पा मारत असताना अचानक ही इमारत कोसळली. या इमारतीखाली चोपडे कुटुंबातील कल्पना चोपडे, मंगेश चोपडे ,सुनीता चोपडे आणि योगेश चोपडे हे चारही सदस्य ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, पालिका कर्मचारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले.

बचाव पथकाने जानकीराम चोपडे, मंगेश चोपडे ,सुनीता चोपडे, योगेश चोपडे यांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले. मात्र जानकीराम चोपडे यांच्या पत्नी कल्पना चोपडे यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तीन तासानंतर कल्पना चोपडे यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला.