रक्कम वसूल करण्यासाठी बिल्डरने ठोठावला महारेराचा दरवाजा

every-construction-site-to-appoint-covid-19-marshal-to-oversee-measures (1)

मुंबई :- मुंबईतील एका बिल्डरने नुकताच आपल्या प्रकल्पातील सात घरखरेदी करणाऱ्यांविरोधात महारेराकडे (Maharera) संपर्क साधला. बांधकाम व्यावसायिक अनीस खान यांनी कुर्ला येथे असलेल्या के.  के.  रेसिडेन्सी प्रोजेक्टमध्ये या घरमालकांना सदनिका दिल्या आहेत. बिल्डरने असा आरोप केला की, ज्या घरखरेदी करणाऱ्यांविरोधात त्याने महारेराकडे संपर्क साधला. अनेकदा मागणी करूनही शिल्लक असलेली रक्कम दिली नाही.

या घरमालकांच्या फ्लॅटसाठी त्याला ताबा प्रमाणपत्र मिळाल्याचा दावाही बिल्डरने केला आहे. या घरमालकांना व्याजासह थकबाकीची रक्कम भरण्यासाठी निर्देश द्यावे अशी मागणी त्यांनी महारेराकडे केली आहे. काही घरमालकांनी असा दावा केला की, त्यांना बिल्डरद्वारे पाठविलेले ताबापत्र प्राप्त झाले नाही. त्यांनी पुढे असा दावा केला की, विकासकाला इमारतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे.

याबाबत महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी आपल्या आदेशानुसार खरेदी करणाऱ्यांनी विक्री कराराच्या अटी व शर्तीनुसार विकासकाला उर्वरित रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. जर त्यांनी पैसे भरण्यास टाळाटाळ केली तर बिल्डर रेराच्या कलम ११ (५) च्या तरतुदीनुसार वाटप रद्द करण्यास पात्र असेल. चॅटर्जी म्हणाले की, विक्री कराराची अंमलबजावणी झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER