गवा विहिरीत पडला, वाचवण्याचे प्रयत्न सुरू

गवा विहिरीत पडला, वाचवण्याचे प्रयत्न सुरू

पाचगणी (प्रतिनिधी) : महाबळेश्वरमधील (Mahabaleshwar) लिंगमळा येथील ग्रीनऊड सोसायटीच्या खाजगी विहीरीत दुपारी गवा पडला. महाबळेश्वर ट्रेकर, वन विभाग व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

महाबळेश्वरमधील लिगमळ्यात अनेक गवे आहेत. लिगमळ्यातील ग्रीनउड सोसायटीत खाजगी विहीरीमध्ये दुपारी गवा पडला. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर त्याला वाचण्याचे काम सुरू झाले. महाबळेश्वर ट्रेकरचे सुनिल भाटीया यांची संपूर्ण टीम, वन विभागाचे कोल्हापुरवरुन विषेश पथक महाबळेश्वर मध्ये दाखल झाले. गव्याला बाहेर काढण्यासाठी वाई येथुन हायोड्रा क्रेन मागवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER