बुढानशहा महिला कमांडो संघटनेचा दारूबंदीचा आदर्श लढा

Maharashtra Today

बदलत्या वेळेसोबत महिलांचं सामाजिक स्थानही दृढ होताना दिसतं आहे. कोणे काळी चुल आणि मुल इथंपर्यंत असणाऱ्या महिला आज संपूर्ण जग पादंक्रांत करत आहेत. आपल्या राष्ट्राच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. आजच्या काळात राज्यपालापासून ते मुख्यमंत्रीपर्यंत आणि आयएएस ते आयपीएस पदाच्या जबाबदाऱ्या महिला पार पाडत आहेत. ग्रामिण पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. गावच्या सुरक्षेपासून ते पुरुषांच्या व्यसनमुक्तीपर्यंत महिलांनी कार्यक्रम हाती घेतलेले आहेत.

या दिवसांमध्ये छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील पिथौर तालुक्यातील अरंड गावाची भलीच मोठी चर्चा आहे. अठाराशे लोकसंख्येच्या गावातील महिला संध्याकाळ झाल्यानंतर घरातून बाहेर पडायला घाबरत. गल्लीपासून ते खेळाच्या मैदानांपर्यंत तिथं दारुड्यांचा हैदोस असायचा अशी परिस्थीती एका वर्षभरापुर्वी होती. खुलेआम तिथं दारुची विक्री व्हायची. पुरुष घरातलं धान्य विकून दारु विकत घेत. पत्नी आणि मुलांना मारहाण करत. या वातावरणामुळं गावची प्रतिमा डागाळलेली होती. दारुच्या व्यसनात युवावर्ग अडकला (Ideal fight against alcoholism) होता.

बुढानशाह नावाने महिला कामांडोंच्या समुहाचे गठन

स्वातंत्र्य संग्रामात हिरीरीने भाग घेणाऱ्या सरस्वी धुरव सुन म्हणून अरंड या गावात आल्या होत्या. त्यांनी गावाची दिवसेंदिवस बिघडणारी प्रतिमा सुधारण्याचा निर्णय घेतला. दारुड्यांच गाव ही ओळख पुसण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांनी इतरांची मदत न मागता स्वतःच या समस्येवर उपाय शोधण्याचा निश्चय केला. स्थानिक पोलिसांच्या मदितीने त्यांनी २७ महिलांची टोळी बनवली. जानेवारी २०२० मध्ये अरंड गावात ‘बुढानशाह’ या नावानं महिला कमांडो समुहाचं गठन करण्यात आलं. या महिलांनी गावात दारुबंदी करण्यासाठी मोहिम उघडली. गावात या महिला कमांडो गस्त घालून दारु विक्रीवर करडी नजर ठेऊ लागल्या. गल्लो गल्लीत दारु पिऊन धुडकुस घालणारे लोक काही आठवड्यांमध्येच दिसायचे बंद झाले. यामुळं गावात सुख आणि शांतता आली.

लाठी आणि टॉर्च घेऊन गावात घालतात गस्त

महिला कमांडोंची (Budhanshah Women’s Commando) उपाध्यक्ष नरुपा ध्रुव आणि इतर महिला रोज घरातलं काम आटोपून संध्याकाळी ७ वाजता गावच्या पंचायती समोर एकत्र जमतात. यानंतर त्यांच्या हातात काठी आणि टॉर्च दिली जाते. त्या रात्री दहा पर्यंत गावात गस्त घालतात. त्यांनी गुलाबी रंगाची साडी हा त्यांचा ड्रेसकोड बनवला आहे. त्यामुळं लोक लांबूनच महिला कमांडो येत असल्याचं समजतात. गावात कच्ची दारु बनवण्याला आणि विक्रीला पुर्णपणे बंदी आहे. अनेकदा कच्ची दारु बनवणाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली आहे. तब्बल दहा जणांवर करावाई करण्यात त्यांना यश आलेलं आहे.

अरंडमध्ये सेवा देणाऱ्या महिला फक्त रात्रीच नाही तर दिवसासुद्धा त्यांची सेवा देतात. गावात सर्वप्रकारचे कार्यक्रम, कुणाच्या घरी लग्न इत्यादी कार्यक्रम असल्यास तिथं एकोप्यानं काम करतात. गावातील दारुड्यांना आणि व्यसनी लोकांना गावापासून कार्यक्रमाच्या दिवशी दुर ठेवण्याची जबाबदारी या महिला खांद्यावर घेतात. २७ महिला कमांडो या संघटनेत काम करत आहेत तर ११ परुष संरक्षकही यात सहाभागी झालेले आहेत. गावचे सरपंच सुद्धा या महिलांसोबत काम करत असून अरंड गावचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button