अर्थसंकल्पीय अधिवेशन : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Devendra Fadnavis - अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पत्रपरिषदेत याबद्दल माहिती दिली. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

महाविकास आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. पीक कर्जाव्यतिरिक्त कुठल्याही कर्जाची माफी केली नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. कर्जमुक्तीच नाही तर कर्जमाफीही या सरकारने दिली नसल्याचे म्हणत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सरकारला लक्ष केले.

नितेश राणे यांनी केली मराठा आंदोलकांची झोपण्याची व्यवस्था

दरम्यान, महाविकास आघाडीत एकमत नसल्याने आधी त्यांनी संवाद साधावा, असे म्हणत भाजपने चहापानावर बहिष्कार टाकल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडी सरकारचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर दीर्घकालीन असलेले पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. या अधिवेशनात महाविकास आघाडीतील अन्य त्यांचा एकत्रित समन्वय किती आहे, एकजूट किती आहे हे दिसणार आहे. दुसरीकडे विरोधक बाकावरील विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक पद्धतीने शिवसेना मित्रत्व सोडून गेल्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झालेल्या या सरकारवर तुटून पडणार हे दिसू लागले आहे.