
वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देण्यावरून ठाकरे सरकार आणि विरोधी भाजपा यांच्यात पहिल्याच दिवशी वादंग पेटले. वैधानिक विकास महामंडळाची न घोषणा करण्यावरून भाजपानं (BJP) ठाकरे सरकार (Thackeray Govt) हल्लाबोल केला. त्याला अजित पवार (Ajit Pawar) महामंडळाचा काय संबंध??असा सवाल राणे (Nilesh Rane) यांनी केला आहे.
१२ आमदार जाहीर होतील तेव्हा वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना करू असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे. १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 2, 2021
राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , १२ आमदार जाहीर होतील, तेव्हा वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा-विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले, तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे. १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध? असे टीकास्त्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर सापडले आहे.
ही बातमी पण वाचा : अजित पवार कोणत्या राजकीय बुद्धीने काम करतात कळत नाही, पंकजांची बोचरी टीका
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला