अर्थसंकल्पीय अधिवेशन: सरकारने काम केले असते तर ३० हजार लोकांचे जीव वाचले असते : देवेंद्र फडणवीस

Maharashtra Today

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session) दुसऱ्या दिवस आहे. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) निशाणा साधला. कोरोना काळात खूप भ्रष्टाचार झाला. सरकारने नीट नियोजन आणि व्यवस्थापन केले असते, तर ३० हजार लोकांचे जीव वाचले असते, असा आरोप फडणवीसांनी केला.

वीज बिलावरून भाजप आक्रमक

विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. वीज बिलाचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, “सर्वसामान्य नागरिकांच्या वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणले जात आहे.” याबाबत विधानभवनाच्या गेटबाहेर प्रतीकात्मक वीजपंप आणून आंदोलन करण्यात आले. भाजपा आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजीदेखील केली.

आधी १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लावा मग…

विधान परिषदेतलील बारा आमदारांच्या घोषणेचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावा, मगच आम्ही मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबतची घोषणा करू. कुठलाही आकडा घ्या. ज्यादिवशी बारा नावे जाहीर होतील, त्यादिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळ जाहीर केले जाईल. कॅबिनेटने एक निर्णय घेतला आहे. १२ नावे विधानपरिषदेची राज्यपाल महोदयांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहेत.”

अजित पवारांच्या निवेदनावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “मी दादांचे आभार मानतो. त्यांच्या मनातले ओठावर आले. अ आमदारांकरता विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले आहे. किती राजकारण? वैधानिक विकास महामंडळे आमच्याकडे होती, म्हणून तुम्हाला बजेट पुन्हा मांडावे लागले. बजेटमध्ये विदर्भ-मराठवाड्याचे पैसे द्यावे लागले होते. ते १२ करतील तर आम्ही ही करू.. असं कसं? राज्यपाल आणि तुमचा विषय आहे. सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला याचे काय देणेघेणे आहे? दादा तुम्हाला विनंती आहे, असे बोलू नका. विदर्भ-मराठवाड्यातली जनता माफ करणार नाही. १२ आमदारांकरता तुम्ही मराठवाडा-विदर्भच्या जनतेला ओलीस ठेवणार का?”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER