आदित्य ठाकरेंच्या सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरू : देवेंद्र फडणवीस

मुंबई :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाईटलाईफ आणि कोरोना निर्बंधांवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीकास्त्र सोडले. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. तिथे त्यांचेच चालते. आदित्य ठाकरेंनी सांगितल्याने पब आणि बार बिनधास्त सुरू असतात. कोरोना हा फक्त शिवजयंती आणि अधिवेशनाच्या वेळी असतो, नाईटलाईफला नसतो, असा टोला फडणवीसांनी लगावला.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. म्हणून त्यांचेच मंत्री नियम धुडकावतात. वरळीतील लोक आदित्य ठाकरे यांचे सगळे ऐकतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे नाईटलाईफ सुरू आहे. कोरोना हा फक्त शिवजयंती आणि अधिवेशनाच्यावेळी असतो, नाईटलाईफला नाही का?, असे म्हणत फडणवीस यांची वरळी नाईटलाईफवर टीका केली.

सायकल मोर्चा हा मीडिया इवेंट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवरही टीका केली. देशात सर्वाधिक पेट्रोल दर असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स ३२ रुपये आहे. पेट्रोलवर सरकारने २७ रुपये टॅक्स लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावे. विरोधी पक्षांची जागा काँग्रेसला घेता येणार नाही. देशात काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे, ते सायकल रॅली काढून मीडिया इवेंट करत आहेत. वीज बिलाचा मुद्दा महत्वाचा आहे. यापूर्वी वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम कधी झाली नाही. अतिवृष्टीची मदत झाली नाही.

पूजा चव्हाणची आत्महत्या दुर्दैवी आहे. मोहन डेलकर यांचीदेखील आत्महत्या दुर्दैवी आहे. कालच्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्र्यांची परिस्थिती केविलवाणी होती. मुख्यमंत्र्यांनी केवळ ऑडिओ क्लिप खऱ्या आहेत की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडले ते खरे की खोट याबाबत उत्तर द्यावे. मराठा आरक्षणप्रश्नी विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे. जे लोकं लसीकरणबाबत चुकीची माहिती पसरवत होती त्यांना नरेंद्र मोदींनी उत्तर दिले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला वेग मिळणार आहे.

ही बातमी पण वाचा : तुमची नैतिकता येणाऱ्या काळात जनताच ठरवेल, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER