तुमची नैतिकता येणाऱ्या काळात जनताच ठरवेल, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लबोल

मुंबई : पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणात स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी दिसत. होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांची (CM Uddhav Thackeray) इतकी केविलवाणी अवस्था मी अदयाप बघितली नाही. मास्क घालूनही त्यांच्या चेहऱ्यावरील केवलवानीपण दिसून येत होत. या प्रकरणातील क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात, असं आव्हान देतानाच कुणाला साधूसंत ठरवायचे असेल तर जरूर ठरवा, पण तुमच्या नैतिकतेचं काय? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज केला. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून, त्या पार्श्वभुमीवर फडणवीस माध्यमांशी बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. अशी स्थिती कोणावरही येऊ नये. मुख्यमंत्र्यांवर तर कधीच नाही. काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नैतिक धैर्य त्यांना साथ देत नसल्याचं जाणवत होतं. चेहऱ्यावर मास्क असतानाही आणि बोलतानाही त्यांना नैतिक धैर्य साथ देत नसल्याचं दिसून येत होतं, अशी टीका फडणवीस यांनी केली.

यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन प्रश्न विचारले. केले. यवतमाळशासकीय रुग्णालयात जे काही घडलं ते खरं की खोटं हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. त्या क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, असं सांगतानाच तुमची नैतिकता काय आहे? हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं. येणाऱ्या काळात तुमची नैतिकता जनताच ठरवेल, असा इशाराच फडणवीस यांनी देऊन टाकला.

यावेळी त्यांनी खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली. ज्या ठिकाणी सुसाईड नोट सापडते किंवा घटना घडते तिथेच तपास झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी डेलकर प्रकरणाचा जरूर तपास करावा. यात एकाही भाजप नेत्याचा हात नाही. किंबहूना यात भाजप नेत्याचा हात नसल्यानेच ते कुणाचंही नाव सांगत नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी केला.

अनेक मंत्री हे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून मिरवतात. यामुळे त्यांचेच मंत्री त्यांचे नियम पायदळी तुडवतात. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचं वरळीतील लोक ऐकतात. म्हणूनच त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे नाईटलाईफ बिनधास्तपणे सुरू करण्यात आली आहे. कोरोना हा फक्त शिवजयंतीसाठी आहे, नाईटलाईफसाठी नाही. अधिवेशनाच्या वेळी कोरोना असतो नाईट लाईफला नसतो, अशा शब्दांत त्यांनी नाईट लाईफवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER