कोरोना : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, 25 जणांना कोरोना; सर्व आमदार निगेटिव्ह

मुंबई : आजपासून राज्याच्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरूवात झाली आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विधानमंडळ प्रशासनाने मोठा निर्णय घेत अधिवेशनाला येणाऱ्यांची कोरोना (Corona) चाचणी केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात 3200 जणांची कोव्हिड-19 (COVID-19) ची टेस्ट करण्यात आली होती. यात 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र एकाही आमदाराला कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सध्यातरी मंत्री आणि आमदार सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाची लागण (Corona Positive) झालेल्यांमध्ये 23 पोलीस कर्मचारी आणि दोन पत्रकारांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये विधीमंडळ, मंत्रालय, पोलीस सुरक्षा आदींचा समावेश आहे. बहुतेक आमदारांनी खासगी टेस्ट केल्याने त्यांचा डाटा उपलब्ध नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. गेल्या दोन दिवसांपासून ही कोरोना चाचणी करण्यात येत होती. काही आमदारांचीही चाचणी झाली होती. मात्र या आमदारांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER