बजेट, नेहमीचेच हे आणि ते…

Budget 2021

Shailendra Paranjapeकेंद्र सरकारचा (Central Government) अर्थसंकल्प (Budget 2021) सादर झाला आणि नेहमीप्रमाणे त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही व्यक्त झाल्यात. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्यावरची तरतूद वाढवणे असो की पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीतली भरीव वाढ असो, या दोनही विषयांवर खरे तर सर्वच राजकीय पक्षांचे एकमत असायला हवे. पण तरीही नेहमीप्रमाणे याही विषयात राजकीय मतच व्यक्त केली जातात कारण आपल्या देशात, व्यवस्थेत काय सांगितलं जातंय यापेक्षा कोण सांगतंय, याला महत्त्व जास्ती दिलं जातं. म्हणूनच तर मग एखादी गोष्ट एखाद्या विशिष्ट चष्म्यातून बघितली जाते आणि मग व्हाट्स अपसह सोशल मिडियावर (Social Media) कोणाच्या काय प्रतिक्रिया असू शकतात, यासंबंधीचे जोक्स फिरू लागतात.

बजेटमुळे सर्वसामान्य माणसाचा फायदा झालाय, हे बघायचं असेल तर अमुक वाहिनी बघा, सामान्यांचे नुकसान झाले असेल तर अमुक वाहिनी बघा, अशा प्रकारचे जोक्स सोशल मिडियावर फिरलेत. तीच गोष्ट केवळ बजेट वा अर्थसंकल्पापुरती नव्हे तर अन्य अनेक विषयांमधेही बघायला मिळते. हे सारे २०१४ मधे भारतीय जनता क्ष सत्तेवर आला आणि नरेन्द्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधानपदी आले तेव्हापासून घडलेय, असं सोयीचं निरीक्षणही काही लोक करताना दिसतात. किंवा हे निरीक्षण योग्य असल्याचा निर्वाळाही देताना दिसतात.

वास्तविक, आपल्या देशात बदल क्रांतिकारी पद्धतीने होत नाहीत. ते हळूहळू होतात आणि त्याचे कारण संपूर्ण भारताला असलेल्या सांस्कृतिक वारशात, सहिष्णुतेच्या शिकवणुकीत त्याचं सार आहे. त्यामुळेच पटकन उठून टोकाची प्रतिक्रया देणं यापेक्षा हळूहळू बदल पचवणं, हे या समाजाचं व्यवच्छेदक लक्षण राहिलेलं आहे. त्यामुळेच मग १९९१ मधे नरसिंह राव पंतप्रधानपदी असताना ते कधीच त्वरेने प्रतिक्रिया देत नसत आणि मग अनेकदा एखादा विषय त्या या वेळी खूप त्वरेचा किंवा गंभीर वाटला तरी थोडा वेळ थांबल्यानंतर त्याचं गांभीर्य किंवा निकड कमी झाल्याचं लक्षात येई. त्यातूनच मग कॉँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्ते विठ्ठलराव गाडगीळ यांचं एक वाक्य माध्यमांमधे खूप गाजलं होतं. ते म्हणाले होते, समटाइम्स नो रिअँक्शन इज अलसो अ रिअंक्शन अर्थात काही वेळा प्रतिक्रिया न देणं, हीच प्रतिक्रिया असू शकते.

त्यामुळे टीव्ही वाहिन्यांना चोवीस तास काही ना काही दाखवायचे असते आणि म्हणूनच मग अर्थसंकल्प मांडणे असो की एखादा अपघात किंवा आयएएसच्या परीक्षेतल्या विद्यार्थ्यांचे यश, त्यांना तातडीने प्रतिक्रिया घेणं, त्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत इतर वाहिन्यांच्या आधी पोहोचवणं, आपणंच सर्वात आधी त्या पोहोचवत असल्याचे डिंडिम वाजवणं, हे सारं करावंच लागतं. म्हणूनच तर अर्थसंकल्पातल्या तरतुदी, त्यावरच्या प्रतिक्रिया यांच्या फंदात न पडता देशपातळीवर झालेल्या हे आणि ते यांच्यातला फरक फक्त मी स्पष्ट करणार आहे.

वर्षानुवर्षे ते होते आणि आता हे आलेत. ते लोकप्रिय बजेट द्यायचे. वर्षभर काही करा किंवा करू नका, बजेटमधून शक्य त सर्वांना खूष करावे, हा प्रयत्न करायचे. त्यातूनच दीर्घकालीन तोटेही उद्भवलेले आहेत. हे काय करताहेत तर यांची सरकारं जिथे जिथे आली तिथे तिथे ह्यांनी पायाभूत सुविधांवर भर दिलाय. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सुवर्ण चतुष्कोण अर्तात संपूर्ण देशाला जोडणाऱ्या चार महामार्गांचे काम सुरू झाले. रस्ता झाला की एसटी जाईल आणि बसगाडी गेली की त्याच मार्गाने विकास जाईल, हा साधा विचार वाजपेयी मांडत.

आता काळ बदलला आहे आणि त्यामुळेच फिजिकल किंवा भौतिक रस्त्यांबरोबरच आभासी रस्ते म्हणजेच सोशल मिडियासह आयटी बीटी विज्ञान-तंत्रज्ञान आणि त्यातल्या अवकाशांचा विचार करून नवनवे रस्ते तयार केले तर दीर्घकालीन यदा होईल, हे लक्षात घेऊन हे काम करत आहेत. त्यातूनच कोविडची पार्श्वभूमी असल्याने ह्यांनी आरोग्यावर जास्तीची तरतूदही केलीय. विविध क्षेत्रांनुसार केलेल्या तरतुदींबद्दल मतमतांतरे होतील आणि होताहेत पण निवडणुकीच्या राज्यांचा विचार तर सर्वच काळात केला जातो तो आत्ताही आहेच. पण त्याबरोबरच देश म्हणून दीर्घकालीन विचार हा आम्ही वाचलो तर देश वाचेल अशाही पद्धतीने ह्यांनी केलेला दिसतोच आहे. त्यामुळे आर्थिक, राजकीय निकडीचा अर्थसंकल्प असं वर्णन केलं तरी भागू शकेल.

ह्यचांनी २०१४ मधे सत्तेवर आल्यानंतर बजेट किंवा अर्थसंकल्प हा मुळात फार चर्चेचा विषय असू नये, अशी भूमिकाच सुरुवातीला मांडली होती. त्यात गैरही नाही. विकास ही शाश्वत आणि निरंतर प्रक्रिया असावी णि सरकार हे केवळ आणि केवळ लोककल्याणकारीच असावं, ही त्यामागची भूमिका. ती तशी भूमिका ते आणि हे दोघेही घेवोत, बजेटवरच्या प्रतिक्रियाही अराजकीय होवोत, ही सर्वच स्टेकहोल्डर्सना शुभेच्छा.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER