बजेट इफेक्ट : शेअर बाजारात तेजी कायम

Stock market

मुंबई : संपूर्ण वर्ष कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये रुतून बसलेले अर्थचक्र गतिमान करणारा हा अर्थसंकल्प आहे. परिणामी अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. आज सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स १४०० अंकांनी तर निफ्टी ४०० पेक्षा अधिक अंकांनी वधारला. यामुळे सेन्सेक्सने पुन्हा एकदा ५० हजारांचा टप्पा ओलांडला.

कोरोना संकटात सापडलेली अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर येत आहे. यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. जागतिक बाजारपेठेतून अर्थव्यवस्थेबाबत चांगले संकेत मिळत आहेत. अमेरिकेतील शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली होती. आशियाई बाजारातही तेजीचे वातावरण आहे. काल अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्सने तब्बल २,३१५ अंकांची वाढ नोंदवत उसळी घेतली होती. ही आतापर्यंत सर्वांत दुसरी मोठी आहे. तर निफ्टी ६४७ अंकांनी वर गेला होता. आज मंगळवारी देखील शेअर बाजारातील तेजी कायम राहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER