अर्थसंकल्प २०२१ : लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद

Coronavirus Vaccine - Nirmala Sitharaman

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्माला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी आज ( दि १) २०२१ चा अर्थसंकल्प (Budget 2021) संसदेच्या पटलावर ठेवला. या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे कोरोना महामारीशी लढण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशभरात सुरु झालेल्या कोरोना लसीकरणासाठी (Coronavirus Vaccination) यंदाच्या अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. याचबरोबर अर्थमंत्र्यांनी पीएम अत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेसाठी (PM Atmanirbhar Swasth Bharat Yojana) ६४ हजार १८० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.

कोरोनाचा (Corona) महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी विशेष तरतूद सरकार करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. भारतात १६ जानेवारीपासून कोरोनावरील लसीकरणास सुरुवात झाली आहे. भारताचा लसीकरणाचा वेग जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. या लसीकरणासाठी सरकारने आता ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.

देशभरातील सामान्य लोकांची कोरोनावरील लसीकरण सरकारने मोफत करावे अशी अपेक्षा होती. पण, याबाबत अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा केलेली नाही. तसेच जगभरातील एक प्रमुख लस उत्पादन करणारी कंपनी असणाऱ्या सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी भारतात लसीकरणासाठी जवळपास ८० हजार कोटी लागतील असे वक्तव्य मध्यंतरी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER