अर्थसंकल्प २०२१ : रेल्वेसाठी १.१० लाख कोटींची तरतूद

Budget 2021 - Railways

दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या २०२१ च्या अर्थसंकल्पात २०३० पर्यंत ‘हायटेक रेल्वे’चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी रेल्वेच्या (Railway) पायाभूत सुविधांसाठी १.१० लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीची तरतूद करण्यात आली आहे.

तामिळनाडू, केरळ आणि आसाममधील रस्त्यांसाठी तरतूद
तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये महामार्गांच्या कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात येथे निवडणुका होणार आहेत. तसेच पश्चिम बंगालमधील महामार्गांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी दिली.

१५ वर्ष जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’
पर्यावरण संरक्षण आणि उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ जाहीर केली. २० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी ‘फिटनेस टेस्ट’ होईल अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER