1 फेब्रुवारीपासून दैनंदिन व्यवहारातील पाच गोष्टींमध्ये होणार बदल

नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी 2021 पासून आपल्या दैनंदिन व्यवहारातील पाच गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 1 फेब्रुवारीला संसदीय अर्थसंकल्प (Budget 2021) सादर केला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी काय महागणार आणि काय स्वस्त होणार, हे आपल्याला 1 तारखेला समजेल. त्याचबरोबर अर्थसंकल्प सादरीकरणानंतर गॅस सिलिंडरचे दर, एटीएममधून रोख पैसे काढण्याचे नियम यासारखे सर्व बदल लागू केले जातील.

सिलिंडरच्या किमती बदलण्याची शक्यता (change the price of the cylinder)

1 फेब्रुवारीपासून सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2020 मध्ये सिलिंडरच्या किमतीत अनेक वेळा वाढ झाली. आता फेब्रुवारीत तेल कंपन्या सिलिंडरच्या किमती वाढवू शकतात. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलिंडर आणि कमर्शिअल सिलिंडरच्या किमती ठरवतात.

एटीएमसंदर्भात बदल (Changes to ATMs)

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी 1 फेब्रुवारीपासून पीएनबी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात येणार आहे. पीएनबी बँकेच्या ग्राहकांना ईएमव्ही नसलेल्या एटीएम मशिनमधून पैसे काढता येणार नाहीत. देशातील वाढत्या एटीएम फसवणुकीला आळा घालण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाचा मोठा निर्णय (Air India’s big decision)

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस फेब्रुवारी ते 27 मार्च 2021 दरम्यान त्रिची आणि सिंगापूरदरम्यान दररोज उड्डाणे सुरू करेल. या मार्गावर कुवैत ते विजयवाडा, हैदराबाद, मंगलोर, त्रिची, कोझिकोड, कुन्नूर आणि कोची ही ठिकाणे असतील. यापूर्वी एअर इंडिया एक्स्प्रेसने जानेवारीपासून अनेक उड्डाणे सुरू केली आहेत.

पीएमसी बँकेची ऑफर (PMC Bank’s offer)

पीएमसी बँकेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 1 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांना ऑफर देण्याची अंतिम मुदत दिली आहे. सेंट्रम ग्रुप भारत पे यासारख्या काही गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे ही ऑफर दिली आहे. याशिवाय ब्रिटनस्थित कंपनी लिबर्टी ग्रुपनेही त्यांची ऑफर सादर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER