
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतेच बीटी वांग्याच्या प्रत्यक्ष परीक्षण आणि चाचण्यावरील बंदी मागे घेतल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना हक्काचे उत्पादन घेता येणार आहेच तर खवय्यानाही स्वच्छ वांग्याची चव चाखायला मिळणार आहे. जेनेटिक इंजीनियरिंग अप्रेजल कमिटीने भविष्यात व्यवसायिक उत्पादन व पुरवठा होण्यासाठी हे पाहून उचलले आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह आठ राज्यात ही चाचणी होणार आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चरल रिसर्चच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑन प्लांट बायोटेक्नॉलॉजी’ यांनी वांग्याचे ‘जनक’ आणि बीएसएस-793′ मध्ये बी टी कॅरी 1 जीन (इव्हेंट 142) हे वाण विकसित केले आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या 2002 पासूनच्या लढय़ाला यश आले आहे.
मध्यप्रदेश, कर्नाटक, बिहार, छत्तीसगढ़, झारखंड, तामिळनाडू, ओरीसा, पश्चिम बंगाल या आठ राज्यात 2020 ते 23 दरम्यान बीटी वांग्याच्या प्रत्यक्ष चाचणीना परवानगी दिली आहे. या आठ राज्यातील सरकारांनी आक्षेप नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर चाचणी घेण्यासाठी अर्ज केलेल्या बीजशितल रिसर्च जालना यांनी शेतातील प्रत्यक्ष प्रयोगासाठी जबाबदार घेतली आहे. या प्रकारे चाचणी घेतल्यावर आलेले निष्कर्ष राज्याच्या व स्थानिक पंचायतीच्या जैवविविधता मंडळाला कळवल्यानंतर देशातील सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
काही शेतकरी संघटनांनी यास विरोधही केला आहे. मात्र या बियांणांमुळे पर्यावरण, शेतकरी, माती यांना धोका असल्याचे आरोप शेतकरी संघटानांनी केला आहे. मात्र बीटी वांगे विकसित करणाऱ्या संशोधकांनी असा कोणताही धोका होणार नसून, हे वाण अत्यंत सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला