बीएसएनएल सुमारे 80 हजार कर्मचा-यांना देणार स्वेच्छा निवृत्ती

BSNL

नवी दिल्ली :- भारत संचार निगमने (बीएसएनएल) त्याच्या सुमारे ७० ते ८० हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने मंजूरी देताच आकर्षक पॅकेज देऊन त्यांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात येणार आहे. तोट्यात चाललेल्या बीएसएनएल भूखंड भाड्याने देऊन पैसे जमवण्याच्या सुरू असलेल्या कसरतीतून जम बसत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामगारांना व्हीआरएस दिल्यावर बीएसएनएलचं काम कसे चालेल? असा सवाल त्यांना करण्यात आला, त्यावर आम्ही मोठ्या प्रमाणावर आउट सोर्सिंग करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका अर्थविषयक इंग्रजी वृत्तपत्रालवा दिलेल्या मुलाखतीत बीएसएनएलचे चेअरमन प्रविणकुमार पुरवार यांनी ही माहिती दिली आहे.

ही बातमी पण वाचा : महावितरणने दिले ४४ बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने कामे

आम्ही व्हीआरएस देण्याचा विचार करत आहोत. ७० ते ८० हजार कामगारांना व्हीआरएस देण्यात येणार आहे. कामगारांना पसंत पडेल असे आकर्षक पॅकेज देण्यात येणार आहे, असे पुरवार म्हणाले. काही लोकांना मासिक कंत्राटावर
घेण्याचाही आमचा विचार आहे. ८० हजार कामगारांना व्हीआरएस दिल्यावर बीएसएनएलकडे १ लाख कर्मचारी उरतात. ही संख्याही पूरेशी असल्याचे पुरवार म्हणाले.

अन्य दूर संचार कंपन्यांप्रमाणे आम्हालाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे सांगताना पुरवार म्हणाले, महसूल वाढवणे आणि महसूल वाचवण्यावर आमचा भर राहील. ऑपरेशनल खर्चाची व्यवस्था लावणे ही आमची दुसरी तातडीची बाब आहे. अनेक खर्चांवर आम्ही पुनर्विचार करण्यात येईल. त्यावर नियंत्रण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

ऊर्जेवर २७०० कोटी रुपये खर्च होतो, त्यात १५ टक्क्याने कपात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्याकडे ६८ हजार टॉवर्स आहेत. त्यापैकी १३ – १४ हजार टॉवर्स भाड्याने देण्यात आले असून त्याच्या भाड्यात वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे बीएसएनएलच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.