बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही तेच पाहिजेत – नितेश राणे

Nitesh Rane

मुंबई : महाराष्ट्रातली सत्ता गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पक्ष श्रेष्ठींनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीची राष्ट्रीय स्तरावरची दिलेली पहिलीच जबाबदारी होती. एनडीएच्या विजयाने ती यशस्वी झाली आहे. यावर भाजपाचे नेते नितेश (Nitesh Rane) यांनी ट्विट केले – बिहार देवेंद्रजींनी आणले.. आता.. महाराष्ट्रला पण देवेंद्रजीच पाहिजे. पुन्हा येणार..येणारच!

भाजपने फडणविसांना बिहार निवडणुकीचे प्रभारी केले होते. फडणवीस यांनी बिहारमध्ये जागावाटपासून ते प्रचारापर्यंत नियोजन केले. महाराष्ट्रातून त्यांचे खास शिलेदारही बिहारमध्ये गेले होते.

दरम्यान, त्यांना कोरोना झाला. हॉस्पिटलमध्ये भरती व्हाव लागल. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. आता ते आराम करत आहेत. काही दिवसांनी ते पुन्हा सक्रिय झाल्यानंतर राज्यातल्या राजकारणात हालचाली आणखी वाढणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER