ब्रिटीशांनी दिलेल्या कटु आठवणी पुसण्याचं काम ब्रिटनच्या कॅडबरीनं केलं !

Maharashtra Today

जगातला सर्वात स्वादीष्ट पदार्थ कुठला हा प्रश्न केला की प्रत्येक जण ‘चॉकलेट’ (Chocolate) हे नाव घेईल. ८ जुलैला तर जागतिक चॉकलेट दिवस साजरा होतो. चॉकलेटबद्दल वर्तमानातील सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु आपल्यातल्या बऱ्याच जणांना त्याचा इतिहास माहिती नाही. भारतात चॉकलेट म्हणजे कॅडबरी असं समीरकरण आहे. याच कॅडबरीच्या प्रवासावर टाकलेली नजर

किराना दुकानातून सुरु झाला प्रवास

ब्रिटन बर्मिंघमचे जॉन कॅडबरी(John Cadbury ) यांनी १८२४ मध्ये ९३ बुल स्ट्रीट, वरुन व्यावसायीक प्रवासाला सुरुवात केली. जॉन तिथं कॉफी आणि चहा विक्री करायचे. तिथं ते चॉकलेट ड्रिंक विकत होते. स्वतःचं दुकान चालत असताना त्यांना हे समजलं की अधिकांश लोकांचा चहाऐवजी चॉकलेट ड्रींक पिण्याकडे जास्त कल असतो. यानंतर १८३१ मध्ये त्यांनी चहा आणि कॉफीला त्यांच्या दुकानातून निरोप दिला आणि फक्त चॉकलेट ड्रिंक विकू लागले. त्यांच्या या बदलाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्याच वर्षी त्यांना चॉकलेट व्यवसायात उतरण्याचं ठरवलं. त्यांनी १८३१ मध्ये एक गोदाम खरेदी करुन तिथं चॉकलेटच्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच कॅडबरीला भरघोस प्रतिसाद मिळाला. १८४७ पर्यंत जॉन यांनी त्यांचे भाऊ बेंजामिन यांना व्यवसायात सामील करुन घेतलं. आता दोघा भावांनी मिळून व्यवसाय उंचीवर नेण्याचं ठरवलं.

१८५४ मध्ये ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरीया यांनी कॅडबरी कंपनीच्या क्वालीटीसाठी त्यांना ‘रॉयल वॉरंट’ प्रमाणपत्र दिलं. याचा अर्थ असा की राजघराण्यातली लोकं हे उत्पादन खरेदी करु शकणार होती. ब्रिटेनमध्ये व्यवसायात यशस्वी झालेल्या दोन्ही बंधूंनी १८६० मध्ये वेगळं व्हायचा निर्णय घेतला. जॉन यांच्यानंतर त्यांचीमुलं रिचर्ड आणि जॉर्ज यांनी व्यवसाय सांभाळला. ब्रिटनमधली बाजारपेठ ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी इतर देशांच्या बाजारपेठा काबीज करायला सुरुवात केली. याच काळात जॉर्ज कॅडबरी यांनी ‘डेरी मिल्क’ बाजारात आणली. १८९७ पासून यावर संशोधन सुरु होतं. हे नाव एका ग्राहकाच्या मुलीच्या नावावरुन ठेवण्यात आलं होतं. आज चॉकलेट या शब्दाला समानअर्थी शब्द म्हणून कॅडबरी जगभरात ओळखली जाऊ लागली. १९०३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात कॅडबरीची विक्री झाली.

स्वातंत्र्याचा आनंद कॅडबरीने तोंड गोड करुन मिळाला

जगभरात झपाट्यानं आणि वेगात पसरणाऱ्या कॅडबरीनं भारतात यायला मात्र बराच वेळ घेतला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये कॅडबरी भारतात दाखल झाली. भारतीयांनी कॅडबरीला अक्षरशः डोक्यावर घेतलं. शिवाय कन्फेक्शनरी, बेवरेज, बिस्कीटं आणि कँडीचं निर्माण कॅडबरीनं नंतरच्या काळात सुरु केलं. ५० हून अधिक राष्ट्रांमधल्या जनतेच्या जीभेवर कॅडबरीनं आपल्या गोडपणाची मोहोर उमटवली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर कॅडबरी भारतात दाखल झाल्यामुळं स्वातंत्र्याचा आनंद कॅडबरीने तोंड गोड करुन साजरा केला गेला.

फक्त लहानमुलांनी चॉकलेट खायचं असतं हा समज कॅडबरीने खोडून काढला. जाहिरातीतल्या सृजनशीलतेच्या जोरावर कॅडबरीनं अनेक लोकांना आपल्याकडं आकर्षित केलं. २००७ मध्ये अमिताभ बच्चन यांनी कॅडबरीची जाहिरात करायला सुरुवात केल्यामुळं या भारतात कॅडबरीचं विशेष महत्त्व वाढलं.

प्रतिमा डागाळली

क्वालीटीसाठी प्रसिद्ध असलेली कॅडबरी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. जेव्हा कॅडबरीतून किडे निघत असल्याची बातमी समोर आली होती. १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून ही बातमी वणव्यासारखी जगभर परसली की कॅडबरीमधून किडे निघाले. यामुळं मोठा भूकंप कंपनीला सोसावा लागला. कॅडबरीचे शेअर्स ३० टक्क्यांनी ढासळले होते. देशात सर्वाधिक विकलं जाणरारं उत्पादन बंद पडेल का? अशी शंका उपस्थीत केली जात होती. या बिकट परिस्थीतीतूनही कॅडबरीनं मार्ग काढला. त्यांनी लोकांची माफी मागितली आणि विश्वासाचं नातं ग्राहकांशी अधिक दृढ केलं. १९ हजार रिटेलर्सना परत मिळवत बाजारात स्वतःचं स्थान परत कॅडबरीनं कमावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button