भारतीय वंशाच्या महिला गुप्तहेर नूर खान यांचा ब्रिटन करणार सन्मान

Noor Khan

लंडन : दुसर्‍या महायुद्धात ब्रिटनसाठी (Britain) गुप्तहेर म्हणून काम करणऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला गुप्तहेर नूर इनायत खान (Noor Khan) यांचा ‘ब्लू प्लेक’ देऊन ब्रिटन सन्मान करणार आहे. लंडनमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या कामांची यादी करुन त्याचा फलक लावण्यात येणार आहे.

ब्लू प्लेक योजना ब्रिटीश हेरिटेज चॅरिटीद्वारे चालविली जाते. यात लंडनमधील विशिष्ट इमारतीत राहून काम केलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान केला जातो. ब्लूम्सबरी येथील फोर टेविटन स्ट्रीटस्थित नूर इनायत खान यांच्या निवासस्थानाला ‘ब्लू प्लेक’ देण्यात येईल. नूर खान या या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तिथे राहत होत्या.

नूर खान या म्हैसूरचे शासक टीपू सुलतान (Tipu Sultan) यांचे वंशज आणि भारतीय सूफी संत हजरत इनायत खान यांच्या कन्या होत्या. नूर या दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटनच्या विशेष ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह (एसओई) च्या एजंट होत्या. वयाच्या ३० व्या वर्षी १९४४ मध्ये त्यांना नाझींनी पळवून नेले आणि त्यांची हत्या केली. नूर यांनी शेवटच्या मोहिमेवर जाण्यापूर्वीच हे घर सोडले होते.

इतिहासकार आणि ‘स्पाई प्रिन्सेस: द लाइफ ऑफ नूर इनायत खान’ या पुस्तकाचे लेखक शरबानी बसू म्हणाले, “नूर इनायत खान शेवटच्या मिशनवर जाण्यापूर्वी या घरात राहत होत्या. त्या धाडसाचे जिवंत उदाहरण बनतील हे स्वप्नातही वाटले नव्हते.” नूर इनायत खान मेमोरियल ट्रस्टचे सह-संस्थापक शरबानी बसू यांनी २०१२ मध्ये गार्डन स्क्वेअरमध्ये नूर यांचा पुतळा बसविला आहे. १९४० मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्वतंत्र ब्रिटीश सीक्रेट सर्व्हिस म्हणून एसओईची स्थापना केली. तिथे नूर या पहिल्या महिला रेडिओ ऑपरेटर होत्या. १९४९ मध्ये त्यांना मरणोत्तर ‘जॉर्ज क्रॉस’ने सन्मानित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER