एका डुक्करासाठी अमेरिकेविरुद्ध ब्रिटन युद्धासाठी मैदानात उतरलं होतं!

Britain was on the battlefield against America for a pig - Maharashtra Today

जगाच्या इतिहासात राष्ट्रा-राष्ट्रांमधील युद्धाची अनेक कारणं आहेत. पाण्यासाठी, संपत्तीसाठी, साम्राज्य विस्तारासाठी अनेक राष्ट्र एकमेकांसमोर तळ ठोकून युद्धासाठी उभी राहिली. यात प्रचंड रक्तपात झाला. अनेक राष्ट्रांना स्वतःचं अस्तित्व टिकवता आलेलं नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या जखमा तर अजूनही ताज्याच आहेत. पण तुम्हाला अशा युद्धाबद्दल माहितीये का ज्याचं कारण एक डुक्कर ठरणार होतं?

ऑरेगन करार आणि बेटाची फाळणी

‘द पिग वॉर’ (The Pig War) म्हणू इतिहासात नोंदवलं गेलेलं युद्ध जगातील विचित्र युद्धांपैकी एक आहे. डुक्करामुळं लढल्या गेलेल्या या युद्धाची सुरुवात झाली होती १८४६ साली. या वर्षी अमेरिका आणि ब्रिटीश सैन्यांत एक करार झाला होता. या कराराची नोंद इतिहासानं ‘ऑरेगन करार’ अशी घेतलीये. या करारानूसार रॉकी डोंगर आणि प्रशांत महासागरातील किनारी भाग या वरुन अमेरिका, ब्रिटिश आणि नॉर्थ अमेरिका ( जो पुढं चालून कॅनेडा झाला.) यांच्यात वाद होता. हा करार करुन तिन्ही देशातला वाद मिटवण्यात आला. या करारानूसार ४९ समांतर रेषांमध्ये हा विवादीत भूभाग तिन्ही देशांमध्ये वाटण्यात आला. या करारात बऱ्याच तृटी होत्या पुढं चालून याचं वादात रुपांतर होणार याचा सर्वांनाच अंदाज आला होता.

लोकांनी वसाहतीला केली सुरुवात

पुढच्या काही वर्षात वाद चालत राहिले. नंतर इथं लोकांनी येऊन शहर वसवायला, रहायला, बाजार उभा करायला सुरुवात केली. १८५९ पर्यंत मोठ्य प्रमाणात ब्रिटिशचे नागरिक इथं येऊन स्थिरावले. इतर दोन्ही राष्ट्रांच्या तुलनेत ब्रिटीनच्या नागरिकांची संख्या इथं तुलनेत मोठी होती. त्यामुळं ब्रिटिश जास्त शक्तीशाली वाट होतं. ‘हडसन की बे कंपनी’ ची इथं स्थापना करण्यात आली. यानंतर कंपनीनं या बेटावर शेतीसाठी जमिन खरेदी केली. यानंतर अमेरिकेतल्या नागरिकांची वस्ती वाढू लागली.

दोन्ही राष्ट्रातील लोकांचा एकमेकांप्रती व्यवहार जिव्हाळ्याचा होता. द्वेषभावना नव्हती. ब्रिटीश अधिकारी ‘जेम्स डगल्स’ यांना आदेश देण्यात आले होते की या बेटावर ब्रिटीशांच अधिपत्य रहावं. यासाठी लागणारे सर्व ते प्रयत्न करावेत. ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या ‘व्हॅक्यूवर’ बेटावर नैसर्गिक संसाधन आणि पाण्याच प्रमाण मुबलक होतं. ब्रिटिश नागरिक इथं वस्ती करत होते तर दुसऱ्या बाजूला अमेरिकन नागरिकांची संख्या वाढत असल्यामुळं तणावाच वातावरण निर्माण होऊ लागलं.

डुक्कराला गोळी मारल्यामुळं सुरु झाला वाद

या दरम्यान १५ जून १८५९ मध्ये ब्रिटिश नागरिकांनी पाळलेला एक डुक्कर फिरत फिरत अमेरिकन शेतकरी ‘लायमॅन कटलर’ यांच्या शेतात शिरला. कटलर यांच्या शेतातील बाटाट्याचं पीक डुक्कर खात असल्याचं बघून त्यांना प्रचंड राग आला. रागाच्या भरात कटलर यांनी डुकराला गोळी मारला. डुकराचा जागेवर मृत्यू झाला. डुकराचा मालक हडसन कंपनीचा कर्मचारी होता, नाव होतं ‘चार्ल्स ग्रिफ्फिन.’ चार्ल्स यांच्याकडे बरीच पाळीव डुकरं होती. डुक्कर पालनातलं ग्रिफ्फिन यांच मोठं नाव होतं. ते नेहमी डुक्करांना चरण्यासाठी मोकळं सोडायचे. या आधी कटलर यांच्या शेतात अनेकदा डुक्कर घुसले होते. ही काही पहिली घटना नव्हती. जेव्हा ग्रिफ्फिन यांना डुक्कराला अमेरिकन शेतकऱ्यांन गोळी घातल्याचं समजलं तेव्हा ते रागाच्या भरात कटलर यांच्याकडे आले. दोघात प्रंचड वाद झाला.

डुक्कराच्या हत्त्येबद्दल कटलर दहा डॉलर्सचा परतावा द्यायला तयार होते. पण ग्रिफ्फिन यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला गाठून कटलर यांना अटक करण्याबद्दल सांगितलं

अमेरिकेनं मैदानात घेतली उडी

अमेरिकेचे नागरिक आता कटलर यांच्या समर्थानत उतरले. त्यांनी एकत्र येऊन कटलर यांना संरक्षणाची याचिका अमेरिकन अधिकाऱ्याकडं केली. जनरल विल्यम्स एस. हार्ने यांनी लोकांच म्हणनं ऐकून घेतलं. जनरल विल्यम्स हे ब्रिटीशांच्या द्वेषासाठी अमेरिकन नागरिकांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांनी वेळ न दवडता २७ जुलै १८५९ ला आपली सैन्याची तुकडी रवाना केली. ब्रिटीश गव्हर्नर जेम्स यांच्या कानावर ही गोष्ट पडताच त्यांनी सैन्याच्या तीन तुकड्या बोलवल्या.

दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभं होतं. अनेक महिने त्यांनी छावणी उठवली नाही. हळूहळू तुकड्या वाढू लागल्या. तणाव निर्माण होऊ लागला. वातावरण चिघळत होतं. पण ब्रटिन नौसेनेचे कमांडर-इन-चीफ रॉबर्ट एल. बेंस तिथं पोहचले आणि परस्थीती हाताबाहेर गेली.

त्यांनी डग्ल्स यांना अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्याची सुचना केली. डग्लस यांनी नकार दिला. एका डुक्करासाठी युद्ध व्हावं हे त्यांना मान्य नव्हतं. शेवटी याबद्दलची खबर अमेरिका आणि ब्रिटन सरकारपर्यंत पोहचली. दोन्ही सरकारानां याबद्दल आश्चर्य होतं की एका डुक्करासाठी परिस्थीती इतकी बिघडली. यात ३ मोठी युद्ध जहाजं, ८२ बंदूका आणि २६०० सैनिक तैनात होते. या मुर्खपूर्ण घटनेला लवकरात लवकर मिटवण्यासाठी तातडीनं हलचाली सुरु झाल्या आणि शेवटी चर्चेतून मार्ग काढून हा वाद मिटवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER