‘पुढाकार घेऊन ठाकरे, फडणवीस, राणेंना एकत्र आणा’, संभाजीराजेंची पवारांना विनंती

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरुन आज सकाळी भाजपचे (BJP) खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबई येथे भेट घेतली. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात जवळपास १५ मिनिटं बैठक चालली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. सर्व नेत्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

संभाजी राजे पुढे म्हणाले, गेल्या तीन-चार दिवसांपासून मी महाराष्ट्राचा दौरा करत आहो. मराठा समाज किती अस्वस्थ, दु:खी आहे हे मी शरद पवारांना सांगितलं. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते (Devendra Fadnavis), नारायण राणे (Narayan Rane), अजित पवार (Ajit Pawar) अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्यांना यावेळी केली.

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा असं मी शरद पवारांना सांगितलं असून त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांशीही चर्चा होणार आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद होईल, या पत्रकार परिषदेत आपली पुढची भूमिका जाहीर करु, असं संभाजीराजेंनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याबद्दलही सांगितलं असून त्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज नाही यावरही शऱद पवारांशी चर्चा झाल्याची माहिती संभाजी राजेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button