जिल्ह्यात पालकमंत्री आणा आणि पाच हजारांचे बक्षीस मिळवा; मनसेची पोस्टर्सबाजी

Hasan Mushrif - Poster

अहमदनगर :- राज्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासून कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू आहे. अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री आपल्या भागात तळ ठोकून आहेत. पण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) जिल्ह्यात फिरकलेच नाहीत, असे मनसेने (MNS) पोस्टरबाजी केली आहे.

कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इतर जिल्ह्यातील पालकमंत्री कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कार्यरत आहेत. परंतु, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात फिरकायला तयार नाहीत. त्यामुळे जो कोणी पालकमंत्र्यांना जिल्ह्यात घेऊन येईल, त्यांना पाच  हजार रुपये बक्षीस दिले जाईल, अशी  मनसेने पोस्टर्सबाजी केली आहे. अहमदनगरहून मुंबई आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटीला तसेच शहरातील रिक्षांवर मनसेकडून पोस्टर्सही लावण्यात आले आहेत.

कामगारांनो, महाराष्ट्र सोडू नका !
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापुरात बऱ्यापैकी सक्रिय आहेत. विशेष म्हणजे संचारबंदी लागल्यानंतरही हसन मुश्रीफ यांनी परप्रांतीय मजूर आणि कामगारांना महाराष्ट्र सोडून जाऊ नका, असे सांगितले होते. “परप्रांतीय मजुरांचे थवेच्या थवे रेल्वेने परत जात आहेत. ते घाबरून आपापल्या राज्यात परतण्याच्या तयारीत आहेत. राज्याचा कामगार मंत्री म्हणून मी त्यांना विनंती करेन की, त्यांनी आपल्या राज्यात परतू नये. १२ ते १३ दिवसांचे हे लॉकडाऊन असेल, तुम्हीही कोणीही आपापल्या राज्यात जाऊ नका. तुमची सगळी जबाबदारी महाविकास आघाडी आणि कामगार मंत्री म्हणून आम्ही घेऊ.” असे हसन मुश्रीफ म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button