ब्रेट लीने केली ४३ लाखांची मदत; बीसीसीआय म्हणते, मानवतेसाठी खेळ!

Bret Lee - Maharashtra Today
Bret Lee - Maharashtra Today

भारतातील (India) कोरोना (Corona) स्थिती पाहून जगभरातून मदतीचा ओघ सुरू झालेला असताना परदेशी क्रिकेटपटूही मोठ्या उदार मनाने मदतीसाठी पुढे येत आहेत. ऑस्ट्रेलियन (Australia) पॅट कमिन्सने (Pat Cummins) सोमवारी ५० हजार डॉलरची मदत जाहीर केल्यानंतर आता त्याचाच देशबांधव ब्रेट ली (Brett Lee) याने एक क्रिप्टो म्हणजे जवळपास ४३ लाख रुपयांची मदत कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जाहीर केली आहे. दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) फ्रॅचाईजींना प्राोत्साहित करण्यासाठी ते जिंकण्यासाठी नाही तर मानवतेसाठी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत असल्याचे म्हटले आहे.

भारत हा नेहमीच माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखा आहे. भारतीयांनी जे प्रेम मला खेळत असताना आणि निवृत्तीनंतरही दिले, त्याची माझ्या हृदयात खास जागा आहे. म्हणून भारतातील लोकांचे या महामारीत अतोनात हाल होत असल्याचे बघून मी खूप व्यथित झालो.

सुदैवाने आम्ही अशा स्थितीत आहोत की आम्ही काही फरक करू शकतो. तेच ध्यानात ठेवून मी एक बीटकॉईनची देणगी (साधारण ४३ लाख रुपये) क्रीप्टो रिलीफ फंडाला देत आहे आणि त्यातून देशभरातील इस्पितळांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याची साधने घेण्यात येण्यासाठी ही मदत आहे. आता सर्वांनी एकत्र येऊन गरजूंना मदत करण्याची ही वेळ आहे. या कठीण काळात अविश्रांत काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांनाही माझे धन्यवाद. माझी जनतेला विनंती आहे की, त्यांनी काळजी घ्यावी, घरीच राहावे, हात वारंवार धूत राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच मास्कचा वापर करत आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत घराबाहेर पडावे. अशा मदतीसंदर्भात पॅट कमिन्सने काल जो पुढाकार घेतला ती अतिशय चांगली गोष्ट होती.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल संघांना ते यावेळी केवळ जिंकण्यासाठी खेळत नसून मानवतेच्या महान कार्यासाठी खेळत असल्याचे म्हणत प्रोत्साहित केले आहे. बीसीसीआयचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी संघांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये म्हटलेय, ‘ आपल्या सर्वांच्या आवडीचा हा खेळ खेळण्यासाठी तुम्ही मैदानात उतरता तेव्हा तुम्ही एक फार महत्त्वाचे काम करता. तुमच्यापैकीच कुणी तरी म्हटलेय की, अलीकडच्या काळातील संकटांकडून लोकांचे लक्ष थोड्या काळासाठी का होईना इतरत्र वळवू शकलात तरी ते फार मोठे काम आहे. तुम्ही मैदानात उतरता तेव्हा सामना बघत असलेल्या लोकांसाठी तुम्ही एक आशेचा किरण असता. त्यापैकी कुणाच्याही चेहऱ्यावर तुम्ही एक मिनिटासाठीसुद्धा हसू आणू शकलात तर तुम्ही फार मोठे काम केले असे म्हणता येईल. तुम्ही सर्व प्रोफेशनल्स आहात आणि तुम्ही जिंकण्यासाठीच खेळत असला तरी यावेळी तुम्ही त्यापेक्षाही किती तरी महत्त्वाच्या मानवतेसाठी खेळत आहात हे विसरू नका, असे अमीन यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button