ब्रेक अप झाले म्हणजे जग संपले असे नाही -अनन्या पांडे

ananya pandey

अनन्या पांडे (Ananya Pandey)ही बॉलिवूडमधील तरुण आणि यशस्वी नायिका आहे. अभिनेता चंकी पांडेची मुलगी असलेल्या अनन्याने 2019 मध्ये करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 (Student of the Year 2) सिनेमातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होेते. त्यानंतर अनन्याने काही सिनेमे केले. आज ती मोठ्या निर्मात्यांची आवडती नायिकाही आहे. अनन्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असून ती सतत काही ना काही शेअर करीत असते. तिच्या फॅन फॉलोईंगची संख्याही मोठी आहे. ही बाब लक्षात घेऊनच अनन्याला एका डेटिंग अॅपने प्रेमाबाबत बोलते केले. अनन्याने यावेळी बोलताना एखाद्याचे ब्रेक अप झाले म्हणजे जग संपले असे नाही असा संदेश तरुणांना दिला आहे.

प्रेमभंग झाला की मुलगा किंवा मुलगी नैराश्यात जातात आणि त्यातून बाहेर पडणे खूपच कठिण जाते. कधी कधी तर अशा घटनांमध्ये आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. आजकालचे तरूण-तरुणी लगेचच नैराश्याची शिकार होतात. अशा प्रेमभंग झालेल्यांनी निराश न होता नव्याने जीवनाला सुरुवात करावी असा संदेश अनन्या देत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम तरुण पिढीवर नक्कीच होईल असे वाटल्यानेच या अॅपने अनन्याला प्रेमाबाबत बोलण्यास तयार केले. अनन्या पांडेने यावेली तिच्या लव्ह लाईफबाबतही खुलेपणाने चर्चा केली आहे. अनन्याने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा उल्लेख करीत सांगितले, ‘माझे सध्याचे रिलेशनशिप स्टेटस ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत’ असे म्हटले आहे.

अनन्याने पुढे म्हटले, बॉलिवूडमध्ये ब्रेकअप झाला किंवा प्रेमात जरी असले तरी, नात्याबाबत खुलासा न करता, आम्ही चांगेल मित्र आहोत असे बोलले जाते. माझाही ब्रेकअप झाला आहे. परंतु मी त्यामुळे निराश झालेली नाही. मला कार्ड जाळणे आवडत नाही. माझ्याकडे ‘एक्स बॉक्स’ आहे ज्यात मी या आठवणी जतन करून ठेवते. या बॉक्समध्ये माझ्या सिनेमाच्या तिकिटी आणि आठवणी आहेत असेही अनन्या म्हणाली. अनन्याने आजच्या तरुण पिढीला मेसेज देताना म्हटले, ब्रेकअपनंतर जे स्वतःला एकाकी समजतात त्यांनी तसे समजू नये. ब्रेकअप झाला म्हणजे सगळे येथेच संपते असे नाही तर एक नवी सुरुवात करण्याची संधी असते असेही अनन्याने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER