ते’ अनाधिकृत क्लब अन् हॉटेल तोडून दाखवा; ना. जितेंद्र आव्हाड यांचे मनपा आयुक्तांना आव्हान

Jitendra Awhad

मीरारोड : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे अनधिकृत हॉटेल तोडल्यामुळे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चिडले. त्यांनी मनपाआयुक्तांना आव्हान दिले – मी १२४ अनधिकृत हॉटेलांची यादी जाहीर करतो त्यातली २४ हॉटेल तरी तोडायची तरी हिंमत दाखवा.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणालेत, आयुक्त डॉ. विजय राठोड, तुम्ही खूप प्रामाणिक व कर्तव्य कठोर आहात तर माजी आमदाराचा क्लब व हॉटेल तोडा, आमच्या कार्यकर्त्याचे हॉटेल अनधिकृत म्हणून कोणाला खुश करण्यासाठी तीन वेळा तोडले. मी १२४ अनधिकृत हॉटेलांची यादी जाहीर करतो त्यातली २४ हॉटेल तरी तोडायची तरी हिंमत दाखवा.

मीरा भाईंदर शहर हे एका व्यक्तीच्या किंवा एका पक्षाच्या मालकीचे नाही आहे. माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत सर्वात जास्त आवाज मी उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सी एन रॉक हॉटेलवर कारवाई करा, तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि कर्तव्य कठोर आहात तर ती बांधकामे तोडा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER