‘ब्रेकअप’चे साईड इफेक्ट..

Break Up

एखाद्यावर मनापासून प्रेम केले असेल आणि त्याच्यासोबत ‘ब्रेकअप’ झाले
असेल तर मघ खुप दुख: होते. भलेही हे दुख: मनाचे असेल, पण परिणामही अत्यंत खोलवर असतो. वैज्ञानिकांच्या मते, मनावरील घावामुळेही मेंदूचा दोन भाग अॅक्टिवेट होतो, जो शरीरावर झालेल्या घावाने अॅक्टिवेट होतो. म्हणजे
मनावर झालेला घाव हा शरीरावर झालेल्या घावाइतकाच खोल असतो. ब्रेकअप हा एक कठीण काळ असतो. याचा परिणाम सर्व भावनात्मक लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. विशेषता आपल्या आरोग्यावर याच जास्त परिणाम दिसतो. जेव्हा आपल्या जवळच्या माणसाची संपर्क तुटतो तेव्हा त्याची अधिक गरज भासू लागते अर्थातच काळजी वाढते. वैज्ञानिकांप्रमाणे ब्रेकअपने मेंदूचा तो भाग सक्रिय होऊन जातो जो साधारणात कोकिनच्या सवयीमुळे होतो. परिणाम झोप येत नाही. पुरेशी झोप न झाल्याने वेदना संदेश पोहचणार्‍या नसा सक्रिय होतात आणि यामुळे डोकेदुखीसह छातीत दुखायला लागते.

एवढेच नाही तर तणावामुळे व्यक्ती स्वत:वर लक्ष देत नाही परिणामस्वरूप स्ट्रेस हार्मोन्समुळे स्कीन प्रॉब्लम सुरू होते. तर केस ही गळायला लागतात. प्रेमात म्हणतात भूक, प्यास सब मर जाती है…पण खर तर, ब्रेकअपच्या तणावामुळे वजन वाढतं. तणावामुळे झोप न येणे, व्यायाम न करणे आणि पोटाचं आरोग्य बिघडल्यामुळे वजन वाढतं. आपल्यावरही यातून काही परिणाम होत असेल तर आपलं चित्त दुसरीकडे लावून यातून बाहेर पडावं, नाहीतर..आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.