बिल वसुलीसाठी वीज तोडा – आदेश

MSEDCL

मुंबई :- लॉकडाऊन (Lockdown) काळात वीज सवलत देण्याची तयारी दखवणाऱ्या उर्जा मंत्रालयाने आता वीजबिल वसुलीची मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. थकबाकी वसूल करण्याचे आणि थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने (MSEDCL) सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले.

महावितरणने म्हटले आहे की, डिसेंबर २०२० अखेर राज्यात एकूण ६३,७४० कोटी रुपये थकबाकी आहे. यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे ४५,४९८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे ८४३५ कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे २४३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये कोविड १९ (COVID-19) मुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसंच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत.

सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून वसुली मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेतही दिले आहे. ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER