झटपट बनवा ब्रेड क्रम्ब्स खीर…

bread crumbs kheer

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवीत असतो. कधी तांदळाची खीर तर कधी शेवयाची खीर…अगदी मुगाची खीर देखील बनवितो. पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या खीर ची रेसिपी सांगणार आहोत.ती म्हणजे ‘ब्रेड क्रम्ब्स’ खीर.

साहित्य : Kheer

  • १ टी स्पून तूप
  • १/२ कप ब्रेड क्रम्ब्स
  • १ कप कंडेन्स्ड मिल्क
  • १/२ कप मिल्क
  • जायफळ आणि वेलची पावडर

कृती :- सर्वात आधी एक पॅन घ्यावे.पॅन तापले की त्यात तूप घालावे.त्यात ब्रेड क्रम्ब्सला थोडा वेळ भाजावे. आता यात कंडेन्स्ड मिल्क टाकावे व नंतर मिल्क टाकून थोड्यावेळ शिजू द्यावे. आता जायफळ आणि वेलची पावडर टाकावे आणि परत थोड्यावेळ शिजू द्यावे. थोड घट्ट आले कि गॅस बंद करावे. आता एका बाॅउल खीर घेऊन वरून ड्राय फ्रुट्सने गार्निश करावे.

ही बातमी पण वाचा : उपवासाचे दहीवडे

ही बातमी पण वाचा : झटपट बनवा ब्रेडची रसमलाई…

ही बातमी पण वाचा : झटपट बनवा ‘कोकोनट-बनाना लड्डू’..

ही बातमी पण वाचा : पश्चिम बंगालचा गोड गोड ‘रसगुल्ला’..