ब्राझीलचे पॉपस्टार गिलबर्टो गिल औरंगाबादेत

अजिंठा- वेरूळ लेणी पाहण्यास गिलबर्टो गिल शहरात

Brazilian popstar Gilberto Gil

औरंगाबाद : द किंग ऑफ पॉप म्हणून ओळखल्या जाणारे ब्राझीलचे पॉपस्टार गिलबर्टो गिल सध्या भारत भ्रमंतीवर आहेत. सोमावारी(ता. 23) ते डेक्कन- ओडीसी या शाही रेल्वेने अजिंठा- वेरुळ लेणी पाहण्यासाठी औरंगाबादेत आले. रेल्वे स्थानकावर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

या स्वागताने गील भारावून गेले. गिलबर्टो गिल जगप्रसिद्ध गायक आहेत. जागतिक स्तरावर त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. त्यांनी ब्राझिलचे संस्कृतीमंत्री पदही भूषविले आहे. संगीतासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गिलबर्टो गिल हे ब्राझीलच्या संगीताची खरी ओळख आहे, असे म्हटले जाते. गिल यांच्यासह 22 पयर्टक या रेल्वेने आले आहेत. या पर्यटकांचे रेल्वेस्थानकावर दिलीप खंडेराय यांच्या कलापथकातर्फे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागताने ते भारावून गेले. यावेळी टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे जसवंत सिंग यांची उपस्थिती होती. यानंतर गिल आणि पर्यटक वेरूळ लेणी पाहण्यासाठी रवाना झाले.

ही बातमी पण वाचा : लता मंगेशकर यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त गुंजनार ”स्वरस्वती” कार्यक्रम, गिनीज बुकात…