शूर आणि धाडसी राष्ट्रकन्या : अखिल भारतीय आखाडा परिषदेचा कंगनाला पाठिंबा

Mahant Narendra Giri - Kangana Ranaut

प्रयागराज : शिवसेनेसोबत (Shiv Sena) सुरू असलेल्या कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) वादात भाजपासोबत (BJP), हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने कंगनाला पाठिंबा घोषित केला आहे. तिला ‘शूर आणि धाडसी राष्ट्रकन्या’ संबोधले आहे.

महाराष्ट्र सरकारने भीतीमुळे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली, असा आरोप आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri) यांनी केला. ते म्हणाले – “बॉलिवूडमधील (Bollywood) घराणेशाही आणि वर्चस्ववादावर कंगनाने निर्भीडपणे आवाज उठवला आहे. तिने ‘ड्रग माफियांचे’ही धाबे दणाणून सोडले आहे. ड्रग माफिया आणि महाराष्ट्र सरकार दोघांनाही कंगनाची भीती वाटते म्हणून तिला लक्ष्य करण्यात येते आहे. देशातील सर्व साधुसंत आणि देशवासी कंगनाच्या पाठीशी आहेत.

हिमाचलप्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने कंगनाला संरक्षण दिल्याबद्दल महंत गिरी यांनी या दोन्ही सरकारांचे आभार मानले आहेत. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना गिरी म्हणाले – कंगनाचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था खूपच वाईट झाली आहे. “पालघरमधील ‘मॉब लिचिंग’मध्ये दोन साधूंची हत्या झाली. त्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने काहीही कारवाई केली नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी आखाडा परिषदेने केली; पण महाराष्ट्र सरकारने ते केले नाही, असा आरोप महंत नरेंद्र गिरी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER